चर्चेचा उद्देश बऱ्याच अंशी सार्थ झाल्यासारखे वाटते. मुख्य उद्देश गैरसमज दूर करणे हा होता/आहे.

गुवणवत्ता
मागील बऱ्याच चर्चांमध्ये गुणवत्तेला प्राध्याण्य दिलेले होते, ते इथे गुणवत्ता मोजायची कशी या प्रश्नावर अडखळलेले दिसतात. अमित कुलकर्णी यांच्या प्रतिसादावरून ते दिसून येते.

गुणवत्तेवरील लेख इथे वाचा http://www.loksatta.com/daily/20060519/vishesh.htm

थोडक्यात गुणवत्ता आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. जसजशी परिस्थिती अनुकूल होत जाते तसतसा IQ वाढत जातो.

मला वाटते आरक्षण समर्थकांनी राखीव जागांचा आग्रह न धरता गुणवत्तेचा मापदंडाचा आग्रह धरावा. TV वरील आंदोलक "तीच पुस्तके, तीच शाळा/महाविद्यालय, तेच शिक्षक असताना आरक्षण का? " असा प्रश्न विचारतात, ते यापुढे "same family & social background "(शब्द सुचला नाही) आग्रह धरतील अशी आशा आहे.
(busy असल्यामुळे वेळ मिळेल तसा इतर प्रतिसादानं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.)