येत्या एका वर्षात तिरंगी मांजरीला आणखी पिल्ले झाली. आणि दैवयोगाने तीपण गेली. सध्या तिरंगी मांजरीशी बरीच मैत्री झाली आहे. हात लावू देत नसली तरी ठराविक वेळांना दारात येऊन हक्कने म्याव म्याव करुन दुधाची खंडणी वसूल करुन जाते. म्याऽऽऽव ची तीव्रता भुकेनुसार आणि समोर आलेल्या माणसानुसार बदलते. उरलेला भात, पोळ्या किंवा बिस्कीटे टाकल्यास माजोरीपणाने न खाता निघून जाते. सकाळी आमच्या इमारतीतल्या एका गृहस्थांच्या पाळीव कुत्र्याबरोबर इमारतीभोवती चकरा मारते.('धर्मनिरपेक्ष' पणा म्हणतात तो हाच की काय?)
खरंच, एखादं पाळीव जनावर असावं घरत. मग ते कुत्रा मांजर असो व पोपट. घरात सजीवपणा येतो. आणि रोज हसायला काही न काही कारण मिळतं..
कधी संधी मिळाली तर तिचं छायाचित्र इथे चिकटवीन म्हणते.