मसाप ची ओळख पुण्यात आल्यावर झाली. मागच्या वर्षी त्यांनी शताब्दी वर्ष साजरा करण्याचा कार्यक्रम घेतला. तेंव्हा त्या समोरील अमृततुल्य मध्ये चहा घेत होतो. बघूयाच आत जाऊन असं म्हणून आत गेलो आणि एक खूप भरीव अश्या संस्थेचं दर्शन झालं.
संस्थेचे वाचनालय खूप समृद्ध आहे. आणि वाचनकक्ष सुद्धा उपलब्ध आहे. संस्थेचा म्हणजे टिळकरोडवर न्यू इंग्लिश शाळे जवळ. पीएमटीचा साहित्य परिषद म्हणून थांबा आहे.
या शतक महोत्सवाचे निमित्त साधून तेथे जाऊन यावे असे सुचवतो.
इतर माहिती सदस्य देतील.
नीलकांत