मेघदूत,
तुमच्या या अप्रतिम उपक्रमाला मनापासून शुभेच्छा ! मला यादीत नमूद बरीच पुस्तकं नावानेही माहिती नव्हती, आता नुसतं नाव-लेखक/लेखिकाच नाही तर त्याबरोबर थोडक्यात वर्णनही वाचायला मिळू शकेल असा उपक्रम सुरू झाला आहे आणि छान सहभागही होतो आहे म्हणता मला मोठी पर्वणीच की. खरंच खरेदी कार्यक्रमाला सुरूवात करायला हरकत नाही.
व्यक्ती आणि वल्लीबद्दल भोमेकाकांशी सहमत.
विशाखा - माझा अत्यंत आवडता कवितासंग्रह. कुसुमाग्रजांच्या अप्रतिम कवितांचा संग्रह.
यक्षांची देणगी - जयंत नारळीकरांच्या विज्ञानकथांचा अप्रतिम संग्रह. त्यांच्या 'प्रेषित' आणि 'वामन परत न आला' ह्या कादंबऱ्या मला जास्त आवडतात.