धन्यवाद अवधूत,

आठवण करून दिल्याबद्दल आभारी आहे. मसाप तशी आमच्या पंतांच्या गोटातलीच. ह्या संस्थेच्या सध्याच्या वास्तूसाठी औंधच्या पंतप्रतिनिधींनी जमीन दिली होती.

ह्या शताब्दी सोहळ्यानिमित्त बालगंधर्व नाट्यमंदिरात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मसापचे संकेतस्थळ प्रकाशित करण्यात येणार आहे.

सध्या माझ्याजवळ यादी नाही. पण सुहासिनी इर्लेकर आणि सुधीर मोघे ह्यांची मुलाखत तसेच इतरही अनेक कार्यक्रम आहेत. प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका आवश्यक आहे.

मसाप ह्या संस्थेचे, तसेच कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. गं. ना. जोगळेकर, पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे अभिनंदन.