या कट्ट्याची सदस्यसंख्या किती?
सध्या ५१५०च्या वर.
ती वाढविण्यासाठी काय करता येईल? या सुंदर कट्ट्याची माहिती अधिकाधिक लोकांना करुन देणे हे सभासदांचे कर्तव्य नाही काय? या हेतुनेच प्रत्येक सभासदाने आपल्या जवळच्या किमान ५ मित्रांना तरी या कट्ट्याची माहिती सांगावी असे मी सुचवितो. आपले याबाबतीत मत काय आहे?
या सर्व मुद्द्यांवर तात्यांशी सहमत.
काही ठराविक(सुमारे ७ ते ८) लोकच या चर्चांत भाग घेतात.
याची कारणे पुढीलपणे असावीत.
१.प्रत्येक माणसाची प्रवृत्ती उदा. (जहाल, मवाळ, आगाऊ, संकोची ई.)
२.त्या त्या विषयांतील जाणकार लोक.
३. आपल्याकडील ज्ञान दुसऱ्याला द्यायला आवडणारे, किंवा आपली मते दुसऱ्यांना सांगू इच्छीणारे लोक.
४. वेळे अभावी लिहू न शकणारे लोक किंवा वेळ जात नाही म्हणून (माझ्यासारखे) लिहिणारे लोक.
५. केवळ वाचनात रस असणारे लोक किंवा प्रत्येक वेळेस आपलं मतप्रदर्शन करण्याची गरज नाही असे वाटणारे लोक.
अनेक लोकांना या कट्ट्याची माहिती नाही असे दिसते.
असावी आणि हळू हळू होईल. घाई कसली आहे?
चू. भू. द्या. घ्या.
(त्या ७-८ लोकांत स्वतःला सामावू इच्छीणारी) प्रियाली