सीमारेषा आत घेतली जाण्याचा 'निकाला' शी संबंध आहे. प्रवेशाशी नाही. शिक्षण क्षेत्रात निकालात आरक्षण आहे अशी आपली भावना आहे काय? नेमबाजीतही तेच. अश्या अतिशयोक्त्या विनोदातच शोभतात म्हणून विनोद म्हटले. आपले गंभीर मार्मिक लिखाण त्याला विनोदी वाटते असा अर्थ नव्हता, कारण ते तसे आहे असे अजूनही वाटत नाही.
चित्रपट व क्रिडा संघातील चमूतील प्रवेश हे आपले एखाद्या समाजाच्या सर्वांगिण प्रगतीचे 'गंभीर' निकष आहेत काय? आरक्षणाशिवाय भारतीय संघाने ऑलंपिक मध्ये मिळवलेले दैदिप्यमान यश आपल्याला खटकते? चित्रपटांचा सुमार दर्जा आपल्याला विषण्ण करतो? हे आपल्याला कुठल्या समाजाच्या अधोगतीचे निदर्शक वाटतात?
भारतीय संघात ११ जागा आहेत. प्रश्न कोट्यावधी जनतेला मिळणाऱ्या सुविधांचा, काही हजार गुणवंताना मिळणाऱ्या/न मिळणाऱ्या शिक्षणाचा व काही लाखांना उपजिविकेसाठी मिळणाऱ्या नोकऱ्यांचा आहे. यात आपल्याला फरक दिसतो की साधर्म्य?
तत्वतः भारतीय संघ वा चित्रपट सृष्टीचे महत्व व सामाजिक योगदान शिक्षणसंस्थांच्या तुलनेने वा सरकारी नोकऱ्यांच्या तुलनेने नगण्य असल्याने असे आरक्षण दिल्यास फारसे बिघडणारेही नाही वा तसे मागण्याची कुणला गरजही वाटत नाही असे त्याचे मत आहे.
या क्षेत्रांबद्दल खराच कळवळा असेल तर रणजी मधील दुर्दशा वा चित्रपटा मधील माफियांचा हस्तक्षेप या विषयांकडे रोख वळवता येईल. पण मूळ मुद्दा भलताच असल्याने तसे करण्यात अर्थ नाही. या लोकांनी सामजिक प्रश्नांना समर्थन करतानाच, काही विशेष न करता, कर वेळेवर भरले तरी पुरेशी देशसेवा ठरेल.
अवांतर १- लिंबाराम, बायचुंग, धोनी, सेहेवाग ची जात माहित आहे का हो कोणाला? अवांतर २ - कला क्षेत्रातले हिंदूचे योगदान त्यांच्या लोखसंच्या प्रमाणात नाही. याबद्दलही एखादे आरक्षण मागण्याचा प्रस्ताव का नाही धाडून देत?
बाकी दिशाभूल करायला मुद्दा छान आहे. अर्थात ही संकल्पना आपली वा नवी नसल्याने आपल्याला फारसा दोष देण्यात अर्थ नाहीच.