<<सीमारेषा आत घेतली जाण्याचा 'निकाला' शी संबंध आहे. प्रवेशाशी नाही. शिक्षण क्षेत्रात निकालात आरक्षण आहे अशी आपली भावना आहे काय? >>
साहेब,
परिक्षेच्या अर्जावर जात हा रकाना का असतो ते सांगाल का? नोकरीच्या अर्हतेत सामान्य भाग आणि राखीव भाग यांच्या किमान गुणवत्तेत फरक असतो हे आपणास माहित आहे का? एकदा बारकाईने नोकरीच्या जाहीराती वाचा.
रोजगारासंबंधी बोलाल तर चित्रपट सृष्टीची वार्षीक उलाढाल अनेक सरकरी उपक्रमांच्या अनेक पटीने आहे हे आपणास माहित आहे का?
<अवांतर १- लिंबाराम, बायचुंग, धोनी, सेहेवाग ची जात माहित आहे का हो कोणाला?> आजपर्यंत या क्षेत्रात आरक्षण नसून गुणवत्तेवर (कधी कधी शिफारसीवर)निवड होत असल्याने जातीची उठाठेव कोण कशाला करेल हो? ते गुणवान आहेत व त्यांचे कौतुक हे असणारच. हेच जर कौशल्य कमी असून केवळ आरक्षणावर आले असते तर आज आपण स्वतः याची नावे घेतली असतीत का?
<अवांतर २ - कला क्षेत्रातले हिंदूचे योगदान त्यांच्या लोखसंच्या प्रमाणात नाही. > अरे वा! ही माहीती नवीन आहे. जरा तपशिल देउ शकाल का?