उत्तर शोधणे चालू आहे !

काल श्रीशी फोनवर बोलताना हे कोडं सांगितलं तर म्हणाली,"धत्तेरेकी ! इतकंच ना? त्यात काय आहे अवघड ! मला माहितेय उत्तर.."
"काय आहे उत्तर?" मी अधीरतेनी विचारलं. 
"पोळ !"
मनातल्या मनात मी ती पोळ ( जाळपोळमधली का? ), तो पोळ , ते पोळं वगैरे करून बघत होते.. तोवर ती वाक्यात प्रयोगही सांगती झाली.."तो पोळा.. ती पोळी.. आणि ते पोळं !"
मी मोबाईल कपाळावर मारून घेतला आणि ती तिकडे जाम हसत सुटली होती माझी गंमत करायची हीदेखिल संधी तिने सोडली नाही म्हणून !

ह्या कोड्याने खरंच भंडावून सोडलं आहे मला, पण भारी मजाही येते आहे या कोडे-सोडवण्याच्या प्रक्रियेमुळे, हेही तितकंच खरं आहे म्हणा. मी सापडतील त्या सगळ्याच शब्दांना 'तो..ती..ते' लावून बघायचा प्रयत्न करते आहे. :D 

या शोधात काही शब्द सापडले जे दोन लिंगांमध्ये चालतात.. 'नाव' आणि काही विशेषनामे जी मुलामुलींमध्ये कोणालाही चालतात.. जसं की 'किरण', 'सुहास', 'शशी' वगैरे ! :D

खरं उत्तर कधी सापडेल कोण जाणे !