मनोगत हे मराठी लेखनाला उत्तेजन देण्यासाठी बनवले आहे आणि येथे इतर भाषिक लेखनास निर्बंध आहेत. ह्यात इतर भाषांबद्दल आकस किंवा इतर भाषांमध्ये लिहिणाऱ्याचा हिरमोड करण्याचा उद्देश नाही. विशेषतः चांगले आणि लोकप्रिय होणारे लिखाण एकाने केले की साहजिकच त्याला प्रतिसाद, त्याचे अनुकरण होत जाते (आणि तेही चांगलेच आहे) पण त्यातून इतरांना मनोगतावर इतर भाषांतून लिहिण्यास उत्तेजन मिळू नये, ह्यासाठी आस्वादात्मक, रसग्रहणात्मक लेखनात इतरभाषिक लेखन १०%पेक्षा कमी ठेवण्याचे आवाहन करण्याचे धोरण ठेवलेले आहे. भाषांतर करायचे असेल, तर मूळ मजकूर न देता त्याचा उल्लेख करून फक्त दुवा द्यावा. (मूळ मजकूर आंतरजालावर नसेल तर आधी तो तयार करून इतर संकेतस्थळावर प्रकाशित करावा आणि मग त्याचा दुवा द्यावा). मनोगतावर अशा लेखनाचे शीर्षक मराठीतच असायला हवे. गद्याचे भाषांतर गद्यात किंवा पद्यात चालेल पण पद्याचे भाषांतर (शक्यतो समछंदी) पद्यातच असायला हवे.