अमेरीकेतील इंडीयन स्टोअर्स मध्ये हरबरा डाळीचे रवाळ पीठ मिळते खास लाडवांसाठी. त्याचे पण करून बघितले आहेत. चांगले होतात. साधे बारीक बेसन पीठाचे पण चांगले होतात. काही जण पीठ भाजत आले की थोडे दूध घालतात त्यामुळे डाळीचे पीठ थोडे रवाळ होते असे म्हणतात. हा प्रयोगही मी करुन बघितला आहे, पण मला काही विषेश फरक जाणवला नाही. अमेरीकेत पीठीसाखर सॅम्स क्लब मध्ये मिळते. पीठीसाखर नसली तरी येथे मिळणारी ग्रॅन्युलेटेड साखर घातली तरी चालते. थोडी कचकच लागते पण त्याने काही बिघडत नाही.