कविता चांगली आहे.

'साती टच' जाणवतो, विशेषतः कडवी क्र. २ आणि ४मध्ये. (कदाचित कडवे क्र.३मध्येसुद्धा असावा, पण तूर्तास मुंबईच्या/महाराष्ट्राच्या राजकारणाचा नियमित आढावा घेत नसल्याने ['regularly follow करणे' अशा अर्थी] संदर्भ लागले नाहीत/फारसा अर्थ कळला नाही. [विशेषतः 'मिठी'चा - 'विलास'म्हणजे विलासराव असावेत एवढा अंदाज लागला, पण संदर्भ कळला नाही.] अर्थात तो दोष सर्वस्वी माझा आहे.)

'लाकडाच्या होड्या' आवडल्या. :-)

एकंदरीत रचना चांगली आहे. तरी पण...

'क्लासिक साती'/'मस्ट रीड' मध्ये गणना करता येणार नाही.

तुमच्या इतर रचनांच्या तुलनेने (चांगली असूनही) 'ते' अपील म्हणावे तितकेसे येत नाही. तुमचे इतर लेखन पाहता तुमच्याकडून याहून अधिक अपेक्षा आहेत/निर्माण झाल्या आहेत.

नेमके काय ते सांगता येत नाही, पण...

कदाचित विषयाच्या बाबतीत अधिक चोखंदळपणा ठेवायला हरकत नसावी. (माझे 'दोन पैशांचे विचार'... टेक दॅट वन फॉर व्हॉटेव्हर इट इज वर्थ. [मराठी?])

रचनेला नावे ठेवण्याचा उद्देश नाही - रचनेत नावे ठेवण्यासारखे काहीच नाही - केवळ तुम्ही याहूनही अधिक चांगले लिहू शकता, आणि लिहीत जावे, एवढेच सांगण्याचा प्रयास आहे.

अर्थात हे माझे 'उचलले बोट, लावले कीबोर्डला' आहे, याची नम्र जाणीव आहे, पण तरीही...

- टग्या.