अमेरीकेत पीठीसाखर सॅम्स क्लब मध्ये मिळते.
आपण राहता त्या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल माहीत नाही, पण मला तरी इथे अटलांटात सॅम्स क्लबव्यतिरिक्त पब्लिक्स/क्रोगरसारख्या सामान्य अमेरिकन ग्रोसरी स्टोअर्समध्ये (यांना मराठीत 'किराणा मालाची दुकाने' म्हणणे जिवावर येते - पुण्यातील 'किराणा मालाच्या दुकानां'चा 'माहौल' डोळ्यासमोर उभा राहतो - म्हणून इंग्रजी शब्दप्रयोग!) 'कन्फेक्शनर्स शुगर' या नावाखाली पिठीसाखर पाहिल्याचे आठवते. चूभूद्याघ्या.
- टग्या.