त्यामुळे कवी राजा बढे यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्याविशी वाटते.

खरेच जर का असा अर्थ असेल तर ... संपूर्णतः सहमत!

गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी
पाहुदे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे (३)

(हवामान वृत्तामध्ये उपग्रहाकडून मिळालेला फोटो पहा किंवा स्पेसशटलमधून दिसणारी पृथ्वी पहा. ती निळीशार दिसते. आणि मध्ये मध्ये पांढरे मेघ (ढग) दिसतात. असे दृश्य फक्त विमानातून किंवा त्याहून अधिक उंचीवरून दिसू शकते. वरील २ ओळी याच सौंदर्याचे वर्णन करत आहेत, नाही का?

आपला तर्क खरा असू शकतो असे या कडव्यावरून स्पष्ट दिसते आहे.