कुणी ९० % मिळवूनही वैद्यकीय वा अभियांत्रिकी शिक्षणापासून वंचित राहतो तर कुणी त्याहून बरेच कमी गुण असताना आरक्षणावर सहज प्रवेश मिळवतो. आजच्या शहरी आधुनिक संस्कृतीत वाढलेल्या, अस्पृश्यता म्हणजे काय हे कधीच पाहायला न मिळालेल्या मुलांना जातीची पहिली ओळख इथे होते.
सहमत.
आपल्या वर्गातल्या मुलांची जात कधी विचारल्याचे मला आठवत नाही. कधी कुणी ए भटा अशी हाक मारली तर तो कधी 'जातीयवाद' वाटला नाही.
सहमत.
पण जेंव्हा प्रत्येक अर्जात जात व धर्म विचारला जातो तेंव्हा प्रश्न पडतो की हाच का 'निधर्मी' देश?
या चर्चेत विचारला गेलेला चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न. जातनिहाय आरक्षणाचे समर्थन करणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे नाहीतर ते "पालथे" आहेत असे निरुपायाने म्हणावे लागेल.