मयुरेशराव,
एखादे संगीत एखाद्याला आवडते, एखाद्याला आवडत नाही. त्याने संगीताचा दर्जा वा गुणवत्ता कमी होते का ?
जे आपल्याला आवडते, तेच "चांगले आणि खरे संगीत" असाच काही एक होरा सर्वांचा असतो, तो कितपत योग्य आहे ?
चांगले आणि गुणवत्तापूर्ण संगीताच्या नक्की काय व्याख्या आहेत ? संगीताचा "दर्जा" ठरविण्याचे नक्की काय परिमाण आहे ? ह्या व्याख्या आणि परिमाण व्यक्तिसापेक्ष नाहीत का ?
आता हेच नियम जरा चित्रपटाला पण लावून बघतो.
मिथुनचे चित्रपट उत्तरप्रदेश/बिहारमधे तूफान चालतात. तिथे त्याचा कुठलाही चित्रपट लागू देत, तो हीट होतोच होतो.
पण, जर इतर भारतात तो चित्रपट तितका चालत नसेल तर त्यामुळे 'त्या चित्रपटाचा दर्जा कमी आहे' असं कोणी म्हणू नये!
बरोबर ना?
हिमेश आणि मिथुनच्या तुलनेस कोणाचा आक्षेप नसावा.