अहिमही -रावणाचे दोन भाऊ/सेनापति- अहिरावण आणि महिरावण. म्हणजे दोन तुल्यबळ आणि एकाच बाजूने लढणारे वीर.
दुसरा अर्थ - अहम् अहम् म्हणजे मी (मोठा/ठी )-- मी (मोठा/ठी ) अशी स्पर्धा म्हणजे अहमहिका. या संस्कृत शब्दावरून तो शब्द आला.
अक्षौहिणी - सैन्याचा आकार मोजणारे एक मापन. आता लक्षात नाही पण पथक, वाहिनी, अशा चढत्या भांजणीने सर्वात शेवटचा सैन्य समूहाचा उल्लेख अक्षौहिणी असा होतो. त्यात इतके पायी, इतके घोडेस्वार, हत्ती, रथी, अतिरथी, महारथी असे सर्व मिळून एक अक्षौहिणी सैन्य होते असा हिशोब आहे. साधारण सेक्शन, प्लॅटून, कंपनी, ब्रिगेड, डिव्हिजन अशा क्रमाने सैन्यदलाची क्षमता मोजली जाते तशा प्रकारे अक्षौहिणी सैन्याचे मापन आहे.
महाभारतात कौरवांकडे ११ अक्षौहिणी आणि पांडवांकडे ७ अक्षौहिणी असे एकंदर १८ अक्षौहिणी सैन्य महायुद्धात होते. महाभारतात १८ हा महत्वाचा आकडा आहे. महाभारताची पर्वे १८, महाभारत युद्ध १८ दिवस चालले, गीतेचे अध्याय १८, एकूण सैन्य (जे सर्व शेवटी मारले गेले)* १८ अक्षौहिणी.
*१८ दिवसाचे युद्ध संपल्यावर सर्व कौरव सैन्य नष्ट झाले, पांडव युद्ध संपले म्हणून निश्वास टाकत होते. अशावेळी अश्वत्थामा आणि कृपाचार्य यांनी झोपलेल्या पांडवांच्या सैन्याचा अधर्माने वध केला.
यथामति अर्थ दिले आहेत. चू.भू.द्या.घ्या.
कलोअ,
सुभाष