श्री. मोडक,

हे गाणे चंद्राला उद्देशून पृथ्वीवरील कवीने लिहिले आहे.  इथे चंद्र पुल्लिंगी नसून (चंद्रिका) स्त्रीलिंगी आहे.  ही चांदणे उधळीत जाते.  चंचल आहे कारण कधी असते तर कधी नाही.  उगविण्याची वेळ सतत बदलते.  मधूनच पूर्ण गुप्त होते, वगैरे.  तारांची फुले म्हणजे मोती उधळत जाते.

आकाशगंगा ही तिच्या(चंद्रिकेच्या) कंबरेची साखळी आहे. (गंगा वाहत म्हणून "वाहती आकाशगंगा" असा शब्दप्रयोग केला आहे.  त्यास दुसरा विशेष अर्थ नाही.) 

चंद्रिकेने लोकांना भुलविले आहे, वेडे केले आहे, (कवी सारखे) प्रेमी रसिकजणांना तिने नादावले आहे.

मधून मधून ढगाआड लपणाऱ्या या चंद्रिकेला कवि म्हणतो कि तुझे अंग झाकून घेऊ नकोस, तुझे सौंदर्य मला मोकळेपणाने पाहू दे.

सरळसरळ अर्थ असलेल्या या गाण्यामध्ये आपण फारच वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहात असे वाटते.

कलोअ,
सुभाष