पहिल्या आणि दुसऱ्या भागांच्या शीर्षकांमध्ये फरक आहे. (उत्तरायण आणि उत्तरारण) हा टंकलेखनाचा दोष आहे की त्यातही काही गूढ अर्थ भरलेला आहे हे समजण्यास वाव नाही.
पहिल्या भागा पेक्षा दुसरा भाग समजण्यास सोपा आहे. लेखन बरेच शब्दबंबाळ आहे. तेही सहन करून त्यामागील 'भावने'ला न्याय द्यायचा म्हंटले तरी अशुद्धलेखनाच्या परमावधीने वाचकाचा विरस होतो. हेही, मनोगतावर शुद्धिचिकित्सकाची एवढी सुंदर सोय उपलब्ध असताना घडत आहे ह्याची मनाला खंत वाटल्यावाचून राहात नाही. आपले साहित्य मनोगतावर वाचकांपुढे ठेवण्याची घाई करू नये. लहान बाळालाही घराबाहेर जाताना आई पावडर, तीट लावून भांग पाडून चांगले-चुंगले कपडे घालून (हल्ली तर नॅपी सहित) नेते. तिच काळजी, तेच कष्ट आपल्या साहित्य-लेखनांत घ्यावे असे सुचवावेसे वाटते.
धन्यवाद.