संशयाचे भूत एखाद्याच्या मानेवर बसले की साथीदाराची जी ससेहोलपट होते ती शब्दात व्यक्त करता येत नाही. तो साथीदार जे भोगत असतो, अनुभवत असतो ते फक्त तोच जाणतो. त्या अवस्थेचं, नात्याचं ओझं मला खांद्यावर, मनावर आणि आयुष्यावर जाणवायला लागलं. ह्याहून वेगळं वर्णन अशक्यच आहे असे वाटते. संशयी व्यक्तीलाही कितीही जाणवलं की आपलं चुकतंय तरी सर्वसामान्यासारखे वागण्याचा त्याचा प्रयत्न तात्कालिक असतो. पुन्हा ती व्यक्ती त्या (संशयाच्या) मार्गानेच जाते. असो.
सुंदर, प्रभावी लेखन.