राजा बढे हे कवीच होते यात तीळमात्र शंका नाही. वैज्ञानिक नक्कीच नव्हते. पण जे न देखे रवि ते देखे कवि असे म्हणतातच ना?

प.वि वर्तक सूक्ष्म देहाने परग्रहावर जातात यावर आपला विश्वास आहे ?

अमेरिकन -रशियन वैज्ञानिकांचे श्रेय कशाला कोण काढून घेईल? आमच्या भारतात अमूक होते आणि तमुक होते असे उगीचच मानणा-यांपैकी मी नाही.

अवकाशातून पृथ्वी निळी दिसते हे तर मान्य? चंद्र तर आपल्याला पांढरा दिसतो.

मग निळावंती  म्हणजे काय?

पाशात्य विज्ञान कथालेखक जर ४०० वर्षे आधीच विविध वैज्ञानिक शोधांचा उल्लेख आपल्या कथेत करत होते (उदा कृत्रिम उपग्रह) . मग १९५६ मध्ये एखादा भारतीय कवी अशी कल्पना करू शकणार नाही?