मेघदूत,
खरं तर गद्य का पद्य हा प्रश्न भावनेच्या आर्द्रतेविषयी नसावा.आपण मेघदूत म्हणजे भावनेच्या ओलाव्याविषयी मी आपल्याला काय सांगावे?काही कवी कवीता लिहितात ती इतरांना लेख अथवा परिच्छेदही वाटतो आणि काही लेख काव्यही वाटु शकते.मी मनोगतावर या विषयावर बरेच प्रतिसाद मुक्तछंदा बद्दल वाचले आहेत.प्रेम ही भावनाच इतकी सुंदर आहे हे आपल्याला गालिब,शेक्सपिअर आणि आपल्या असंख्य कविलेखकांच्या रचनेंनी प्रत्ययास येते असे नाही तर स्वानूभव आपल्याला एका वेगळ्या विश्वाचि प्रचिती देतो व उत्स्फ़ुर्त लिखाण घडू शकते मग ते कदाचित या गद्यपद्याच्या सीमा पाळण्यापेक्षा आस्वादक असू शकत नाही का?
आणि अति म्हणजे कल्पनाविलासाच्या बाबतीत जहां न जाय रवि वहां जाय कवि...असे म्हणू की गालीबच्या भाषेत..तूने पी ही नही...असे म्हणू?
कृपया राग नसावा.
शीला.