साधारणतः तुमच्या विचारांशी मी सहमत आहे असे मला वाटते.
----
असे आरक्षण म्हणजे जातियवादी अतिरेकाचा नमुना आहे. केवळ मतांसाठीचे राजकारण आहे. या घाणेरड्या निर्णयामूळे आपल्यात पुन्हा एकदा सरळ-सरळ फुट पडलेली दिसत आहे. सत्ताकारण्यांना तेच हवे असते. हे चिंताजनक आहे. आरक्षणाचे महत्त्व कोणी नाकारू नये. डोंगराळ भागात राहणारे लोक, अति खेड्यात, दुर्गम ठिकाणी राहणारे लोक, तांड्यात, बंजारा वस्त्यात राहणारे लोक, वनवासी, आर्थिक दृष्ट्या पिचलेले लोक या सर्वांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देणे चांगली सोय आहे. पण केवळ जात पाहून एखादी सवलत देणे हा जातियवाद आहे. काही दिवसात धर्मनिरपेक्ष भारताचे ओळख धर्मनिरपेक्ष-पण-जातियवादी अशी होण्यास वेळ लागणार नाही. वर्गविरहीत समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे लोक मात्र 'वर्णा' ला मानतात अशी विचित्र विचारसरणी पाहून आश्चर्य वाटते!
सरकारातील लोकांनी असे जातीचे राजकारण बंद करावे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते हानिकारक आहे.
आरक्षणा व्यतिरिक्तही  इतर अजून व्यवस्था अंमलात येतील. त्यावरही विचार व्हावा.