'उंचावून कर उभे माड हे' ह्या कवितेतील आणखी काही ओळी आठवल्या आहेत. कुणा मनोगतीस त्या वाचल्यावर मला न आठवणार्या ओळी आठवल्यास सोन्याहून पिवळे!!
उंचावून कर उभे माड हे शिरी वीरापरि झेलीत वृष्टी
जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी ॥
हिरवी धरणी, श्यामल डोंगर, धूसर निळसर तलम हवा ही
लाल---------जळातून वाहे उसळत खिदळत चंचल काही ॥
भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी
मधून ठिपके थेंब कोवळा, फुलवित जळी वलयांची नक्षी ॥
छेडी सुरावट मल्हाराची धारांच्या तारांवर वारा
लख्ख वीजेच्या प्रतिबिंबाचा क्षणात गोठून झाला पारा ॥
मिचकावित केशरी पापणी कुठे दिव्यांच्या ज्योती हसती
---------- कौलारावर गुच्छ धुराचे झुलती, भिजती ॥
कृपया स्मरणशकीत ताण देऊन उर्वरीत कविता आठवते का बघा.
-वरदा