माझ्या वडिलांचे एक मामा होते, त्यांच्या एका मेव्हण्याचे नाव "विनायक" होते ( इथे कुणाची/कुणाच्या नावाची चेष्टा करणे हा हेतु नाही.). बहुतेक त्यांच्या त्या मेव्हणाने त्यांना बराच मानसिक आणि आर्थिक त्रास दिला असावा. त्या मुळे त्यांनी त्या नावाचा इतका धसका घेतला होता की बस. माझा जन्म संकष्टीचा म्हणून माझे नाव घरची मंडळी "विनायक" ठेवतील , तेंव्हा तसे करू नका हे सांगण्यासाठी ते बिचारे वयस्कर गृहस्थ लांबचा प्रवास करून माझ्या बारशाला दोन दिवस आधीच आले होते म्हणे...
आहे की नाही नावाचे माहात्म्य ...