१)ऑलिंपिक चे बोधचिन्ह सर्वाना महित आहे. एकमेकात गुंतलेली ५ वर्तुळे. जी आहेत ऑलिंपिक मध्ये भाग घेणा-या ५ खंडांचे प्रतीक. यदाकदाचित काही कारणाने हा संदर्भ विस्मरणात गेला तर या वर्तुळांचा अर्थ सांगता येईल?
२)केबीसी-२ मध्ये १ प्रश्न विचारला गेला होता. एका शहरात (बहुतेक व्हिएन्ना) एका हॉकीपटूचे शिल्प आहे ज्याला ४ हात असून सर्व हातात हॉकीस्टीक आहेत. तर हा हॉकीपटु कोण? उत्तर होते अर्थात हॉकीचा जादुगार मे. ध्यानचंद. मला सांगा की त्याला वास्तवात ४ हात होते का? पण त्याचे कौशल्य चार हातांनी खेळण्याइतके होते. उद्या कोणी म्हटले की हा चार असलेला देव कोण ?तर आश्चर्य वाटणार नाही.
शंकर हे देखील एक रूपक असेल.?
हे आधुनिक युगात घडत असल्याने त्यात काही वावगं वाटत नाही. पण कालौघात संदर्भ पुसले जातात. म्हणून ही उदाहरणे.
पुन्हा भेट सोमवारी.
सर्वांना happy week end.