शर्मिला ह्या नावाचा पटेल असा अर्थ माहित नाही. मुलीचे नाव शर्मिला का?
एके ठिकाणी मुलीचे इतिश्री असे नाव ठेवल्याचे ऐकले आहे.

शैवाली  - शेवाळलेली? हे नाव ऐकले आहे.
शेफाली - शेफारलेली? (सॉरी रहावले नाही.)
असे वाचले की कुण्या गृहस्थाने मुलीचे श्लेष्मा असे नाव ठेवले होते म्हणजे शेंबडी! नंतर अर्थ कळल्यावर बदलले.

निमिष हे एक विचित्र नाव. मुलाचे नाव ठेवावे इतक अर्थ चांगला वाटत नाही.
पराग हेही नाव इतके पॉप्युलर का? माहीत नाही.
सुचिता - चांगली चिता? असे नाव ऐकले आहे.