कचरू, टोपाजी, उकंडा वगैरे अशी नावे ऐकलेली आढळतील. पूर्वीच्या काळी बालमृत्यूचे प्रमाण अधिक असायचे. मुला/मुलीचे नाव आकर्षक ठेवले तर त्याची दृष्ट होईल म्हणून मुद्दाम असे 'अनाकर्षक' नाव ठेवण्याची पद्धत होती.

अनिकेत याचा शब्दशः अर्थ जरी घर-दार नसलेला असला तरी भावार्थ वेगळा असावा (=ऐहीक गोष्टीत न गुंतलेला अशासारखा). श्रीकृष्णाच्या प्रिय भक्ताची लक्षणे सांगताना गीतेत हा शब्द बाराव्या अध्यायात आढळेल.  (अनिकेतः स्थिर्मतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः)
अपर्णा - शंकराच्या ध्यासाने गौरी अन्नपाण्यावाचुन केवळ पाने खाऊन जगली होती म्हणून ती अपर्णा, असे ऐकले आहे.  शब्दशः अर्थ पाने नसलेली असा होतो का हे ठाऊक नाही!

एक (ह घ्या) किस्सा: एका मित्राला मुलगी झाली, त्याना भेटायला म्हणून आम्ही सगळा मित्रपरिवार जमलो होतो. नाव काय ठेवावे असा सहजपणॆ विषय निघाला. बाळ सोडून इतर सर्वांचे हसणे-खिदळणे सुरू होते. ते बाळ मात्र बराच वेळचे रडतच होते, शांत होण्याचे नावच घेईना. एक मित्र तिचे रडणे पाहून न राहावून म्हणाला - हीचे नाव आकांतिका कसे वाटते?  विशेष म्हणजे कॊनवेंट मध्ये शिकलेल्या त्या मातेला ते नाव आवडलेही !! त्या मातेचा निष्पापपणा पाहून इतरांची मात्र हसून-हसून पुरेवाट झाली.