लुचाई नावाची कादंबरी धारपांचीच का? मी ही खूप वाचलय पण आता आठवत नाही फारसं. समर्थ चांगले आठवतात. धारप रंगांचा ही फार चांगला वापर करतात.
जस, काळेशार पाणी, हिरवेकंच रान.
लहानपणी ही कादंबरी वाचली होती. लुचाई म्हणजे लुच्चेगिरी की काय अस वाटल होत, वाचल्यावर कळल की रक्त लुचण्यावर आहे. रात्री जाम भिती वाटायची. ः) व्हॅम्पायर वर होती पण नक्की धारपांचीच का ते आठवत नाही.
मंगळावरून येऊन पृथ्वीवर धुमाकूळ घालणाऱ्या हिरव्या रंगाच्या परग्रहवासियांची कादंबरीही त्यांचीच ना?