नावांविषयी चर्चा चालू आहे म्हणून आम्हां भावंडांच्या नावातली साधर्म्यता सांगतो. आम्ही चार भावंडे. प्रत्येकाला दोन नावे. नावांचे निरीक्षण करता यावे म्हणून खालीलप्रमाणे देतो.
थोरला = आनंद + मुकुंद
दुसरा = अनिरुद्ध + मकरंद
तिसरा (मी ) = अवधूत + मिलिंद
धाकटा = आशुतोष + महेंद्र
वरील नावांमध्ये प्रत्येकाचे एक नाव 'अ' पासून व दुसरे नाव 'म'पासून सुरू होते. 'अ'च्या नावांत थोरला वगळता सर्वांची नावे चार अक्षरी . 'म'मध्ये दुसरा वगळता सर्वांची नावे तीन अक्षरी. ('अ'च्या नावांच्या बरोबर उलट ). सर्वांची दुसरी नावे 'म' पासून व तेथेही 'द' या अक्षराचा शेवटापाशी (महेंद्र मध्ये चूक करून)उपयोग.'म'पासून सुरू होणाऱ्या नावांच्या उपान्त्य अक्षरांत ('द' पूर्वी )अनुस्वाराचा उपयोग.
अशी साधर्म्यता वा विशेषता अजून इतरांच्या नावात असू शकेल.