ऐका तर मंडळी...(किस्सा सांगो वांगीचा असल्याने या कानाने ऐकून त्याच कानाने सोडून देणे...लहानपणी कुणीतरी छाती ठोकून सांगितला होता..खऱ्या खोट्याची शहानिशा करण्याची गरज वाटली नाही, आपल्याला वाटल्यास अधिक शोध घ्यावा)
कमल हासनचे वडिल स्वातंत्र्यसैनिक होते. ते निधर्मी व जात पात न मानणारे होते. आपल्या मुलांनाही त्यांनी तसेच वाढवले. त्यांचा एक जीवलग मुसलमान मित्र अवेळी वारला. मरताना मृत्युशय्येवर त्याने आपण निपुत्रिक मरतो आहोत आणि आपला निर्वंश होतो आहे अशी खंत कमलच्या वडिलांजवळ व्यक्त केली. त्यावर भावूक होऊन कमलच्या वडिलांनी त्याला वचन दिले की मी माझ्या मुलांच्या नावात तुझे नाव लावीन. कमलच्या इतर भावांची नावे चारु हासन व चंद्रु हासन आहेत.
आहे ना सुरस?
चू. भू. द्या. घ्या.
प्रियाली