अनुभव खुप बोलके आहेत, खास करुन तमिळ माणसांचे. मला ही असेच काहि अनुभव आहेत. पण अनेकदा हे अनुभव अंतर्मुख करुन जातात.

  1. तमिळ लोक हिंदीला राष्ट्रभाषा समजत नाहित हे खरे आहे. माझे या बाबतीत अनेक मजेशीर अनुभव आहेत. मी एकदा संत बनुन माझ्या एक तमिळ सहकार्‍याला जर्मनीला जायला मार्ग मोकळा करुन दिला. या लोकांचा हा अनुभव माहित असल्याने (माझ्या कामाच्या ठिकाणी हे अनेक लोक एकत्र असल्याने असे अनेक अनुभव आले होते) तो सहकारी तिकडे गेल्यावर मी मुद्दाम होउन हिंदी वा काहि वेळा जर्मन भाषेत व्यवहार केला. त्याने खुप खटाटोप केला पण मी बरेचदा हिंदी चा ठेका सोडला नाही.
  2. अनेक तमिळ लोक साहेबाच्या (आम्ही त्यांना आजही साहेब मानत नाही) भाषेला जवळ करुन साहेबाच्या जवळ जाउन आंतरराष्ट्रिय वर्तुळात पुढे आहेत अन आम्ही मागे. कारण ज्ञानाची जगाची भाषा आंग्ल आहे.
  3. आम्ही हिंदी राष्ट्रभाषा म्हणुन मान्य केली अन मराठीला दुय्यम मानले. (आज आमच्यात सुद्धा मराठीला तुच्छ लेखणारे अनेक आहेत.) आंग्ल भाषेला आम्ही जास्त जवळ केले नाही. पण आता जेव्हा गरज भासते आहे तेव्हा हे तामिळ लोक अधिच तिथे जाउन आमच्यावर पावशेर ठेउ पाहतात.
  4. भारतात दक्षिणेला हिंदीचा प्रसार कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राजकारण होय. अगदि स्पष्ट्च बोलायचे झाले तर उत्तर प्रदेशातले वा काश्मीरमधले (नक्की माहित नाही) नेहरु घराणे जे आजहि देशाला स्वत:चे राज्य समजतात. त्यांची भाषा हिंदी. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके हिंदी लोकांचे वर्चस्व राजकारणावर राहिले आहे. कारण उत्तर प्रदेशच्या लोकसभेची सदस्य संख्या. त्यामुळे त्याचे वर्चस्व  राहुन त्यांनी दाक्षिणात्य लोकांना नेहमीच कामा पुरते जवळ केले आणि झिडकारले. त्याची फ़ळे आपण भोगतो आहोत. मराठी माणुस यात नेहमीच मागे पडतो. त्याला अस्मितेचा फ़ारसा फ़रक पडत नाही. पण दाक्षिणात्य तसे नाहीत. त्यांनी कोणावर अवलंबुन न राहता स्वत:चे बरेच काहि उभे केले. चित्रपट हे एक त्यातले उदाहरण.
  5. घरी मातृभाषा न बोलणे हा कोणता मोठेपणा आहे कोणास ठाउक? पण त्यातुन नाती सुद्ध कृत्रीम बनतात.
  6. स्वानुभव असा अहे कि फ़क्त तमिळ लोक एवढे टोकाची भुमिका घेणारे असतात. कन्नड, मल्याळी वा तेलगु लोक पटकन मिसळुन घेतात वा जातात. माझ्या बरोबर माझे अनेक कन्नड मित्र मराठी बोलतात वा शिकण्याची इच्छा व्यक्त करतात.
  7. मुख्य म्हणजे आपण भारताच्या मधल्या भागातले आहोत. हिंदी आणि दाक्षिणात्य लोकांना जोडणारे. अन मधला कधी होउ नये - इति - व. पु. काळे.
  8. युरोपमध्ये देश छोटे आहेत पण अनेक देशांनी आपली राष्ट्रभाषा जपली आहे. ते आंग्ल भाषा अभावानेच बोलतात. तरिही ते आपला देश, देशाभिमान टिकवुन आहेत आणि एकता (युरोपियन युनियन). आपण थोडे तसेच आहोत. पण आपण राज्याभिमान बाळगत नाही. भविष्यात कदाचित आपण यु एस आय असु?
  9. आज मनोगत आणि मनोगती आहेत म्हणुन आपण मराठी चांगली टिकवुन आहे.

जय महाराष्ट्र!!

जय भारत!!!