इंडियन एक्स्प्रेस समूह हा आजचा आघाडीचा व्रुत्तपत्र समूह. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा, आणि समाजाला नैतिक अधःपतनापासून वाचविण्याची मक्तेदारी आपल्याकडेच आहे असे मानणारा. पण...

राजस्थान न्यायालयाने सलमान खानला शिक्षा सुनावली त्या काळातिल त्यांच्या बातम्या पहा. जणू काही सलमान खान हा कोणी  राष्ट्रीय हिरो आहे आणि न्यायालयाने त्याला शिक्षा देऊन फार मोठा अन्याय केला आहे असं वाटावं असं वाटावं अशा प्रकारे त्याला प्रसिध्द्दी दिली होती .

हि गोष्ट आपल्याला योग्य वाटते का? हि नैतिकता आहे काय? समजाला हेच मार्गदर्शन व्रुत्तपत्रांकडून अपेक्षित आहे काय? कि निव्वळ बातमीचे विक्रीमूल्यच महत्त्वाचं आहे?