तांबडफुटी - गो. नी. दांडेकर

गोनीदांच्या लेखनाची मी एक निस्सीम चाहती.  तांबडफुटी ही सुध्दा त्यांची एक अप्रतिम कादंबरी.  कोकणाची पार्श्वभूमी.  सरधोपट मार्गाने जाण्यापेक्षा वेगळे काही करु पाहणारा नायक, जो स्वतःबरोबर सर्व गावाचीच प्रगती साधू पाहतो.  साहजिकच त्याला होणारा विरोध, अतिशय सजीव पात्रे.  गोनीदांच्या सर्वच लिखाणातील नायिका तेजस्वी, ताठ कण्याच्या, स्वत्व जपणाऱ्या असतात, यातील सुमनही त्याला अपवाद नाही.

स्वाती