"परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी" या ओळीचा उत्तरार्ध "स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी" असा आहे. हे स्वतंत्रते भगवती परवशतेच्या नभात,  आकाशात तू चमचमणारी लखलखणारी चांदणी होतेस असा अर्थ आहे. नभात, आकाशात ही द्विरुक्ती मूळ कवीचीच आहे. नभ या शब्दाचा पावसाळा, वर्षाऋतु असाही अर्थ आहे.