शब्दांच्या लिंगांविषयी मुद्दा उपस्थित करून मराठी आणि इतर संस्कृतोद्भव भाषांतील या अनावश्यक अवघडपणाचा जो उल्लेख झाला आहे तो बरोबरच आहे.दाक्षिणात्याना मराठी शिकणे त्यामुळे अवघड वाटते शब्दाचे लिंग ठरवण्याला कुठलाही नियम नाही.आपण बालपणापासून सवय झाल्याने चुकत नाही येवढेच.काही शब्द काही मराठी भाषिकसुद्धा वेगळ्या लिंगांचे समजतात उदा.ढेकर आला असे काही म्हणतात तर काही आली म्हणतात. यानिमित्तानेमराठी आणि संस्कृतोद्भव सर्वच भाषा संस्कृतच्या कुबड्या सदैव वापरून स्वतःची प्रगति करून घेऊ शकल्या नाहीत हे सत्य आपल्याला मान्य करावे लागेल.एका शब्दापासून अनेक शब्द करायला आपल्याला संस्कृतचाच आधार घ्यावा लागतो.एक साधे उदाहरण,शिकविणे या क्रियापदापासून शिकणारा आणि शिकविणारा या अर्थी शब्द होत नाहीत त्यासाठी संस्कृतमधून शिक्षक, अध्यापक,विद्यार्थी हे शब्द घ्यावे लागतात.याउलट इंग्रजीमध्ये teacher,taught शब्द सहज करता येतात.त्यामुळे अधीक्षक अभियंता वगैरे बोजड शब्द वापरावे लागतात.मराठीत काही प्रत्यय वापरून इतर शब्द होतात पण एकूण त्यांचे प्रमाण कमी विशेषतः शास्त्रीय विषयावर लिहिताना ही अडचण मोठ्या प्रमाणात जाणवते