लेख वाचला. स्वामिनोमिक्स जबरदस्त असते!
----

एक प्रश्न (मूळ प्रश्नाची आठवण राहावी म्हणून द्यावा वाटला)
- अर्जुनसिंहानी प्रपोज केलेल्या आरक्षणामूळे ज्या घटकांचा फायदा व्हायला हवा त्यांचाच होईल का? की ओबीसी मधल्या 'उच्चवर्णियांनाच' अधिकाधिक संधी मिळतील?
---

लेखातील एक विशेष बाब (मला जमलेले स्वैर रुपांतर, काही चूक असल्यास निदर्शनास आणावी): "आपण याहून अधिक चांगला समाज कसा तयार करणार? आरक्षण राजकीयदृष्ट्या लोकप्रिय खेळी आहे, पण ते समस्येचे निदान (उत्तर) नाही. आरक्षणामूळे लाख-दोन लाख (ओबीसीतल्या सधन) लोकांचा फायदा होईल, पण उर्वरीत दहा-बारा दशलक्ष लोक मात्र उपेक्षितच राहतील"
मी ही हेच म्हणतो .... सध्याचे हे आरक्षण हा राजकीय डाव आहे, त्यात समाजकल्याणाचा शुद्ध हेतू नाही. मतांचे राजकारण आहे. याच लेखात पुढे मूळ समस्येचे निराकरण कसे करावे हे सुचवणारी एक कल्पना देखील सांगीतली आहे....
ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्या फायद्यासाठी म्हणून ठीक आहे. पण सरसकट जाती नुसार (तेही राजकीय दृष्ट्या दुभत्या जातींना आरक्षण देणे) हे निरर्थक आहे, समाजात फुट पाडणारे आहे. अशा जातीयवादाचे समर्थन स्वामीजींनीही त्यांच्या लेखात केले नाही आणि आपणही कोणी करू नाही.