लुचाई ही कादंबरी किंवा तिचा काही भाग स्टिफन किंगच्या 'सालेम्स लॉट' वरुन घेतलेला वाटतो.(कालच सालेम्स लॉट खिशाला चिमटा घेऊन विकत घेतली.) पण लुचाई कादंबरी खरंच सुंदर आहे.
लुचाई, सैतान,शपथ,किमयागार, मैफल,आपण सारी धरतीची लेकरं(किंवा असेच काही तरी नाव),चेटूक(कथेचे नाव आठवत नाही, पण त्यात आफ्रीकन चेटकाचा उल्लेख आहे.),पडछाया मधील एक कथा ज्यात कार्तिक परमार आणि विनायक ही पात्रे आहेत आणि अमावस्येला एका बळदात कणिक आणि गुलालाचा बाहुला ठेवल्याचा उल्लेख आहे, या कथा मला फार आवडतात.  आणि एक कथा आहे. नातवांचे आगार. तीपण मला आवडते. समर्थ आणि अप्पा मध्ये थोडीशी होम्स आणि वॅटसन जोडीची आठवण येते.