चक्रपाणि, तात्या, जयश्री आणि लीना,
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
संध्या खेळते फुगडी
उषेसह गगन मंडपी
कोणत्या गूढ उपक्रमी
तहान भूक हरपली?
हा शिल्पकार इतका कोणत्या कलाकृतीत रमलाय की त्याला प्रातःकाळ आणि सायंकाळचे सृष्टी सौंदर्य पाहायला सुद्धा वेळ नाही? येथे त्यांच्या फुगडीने अनेक दिवस-रात्र कसे सरतात हे दर्शवण्याचा प्रयत्न केलाय. ती मूर्ती अजून अपूर्ण असल्याने कोणती कलाकृती हा प्रश्न उपस्थित केलाय.
प्राजक्त उभा प्रसन्नतेचा
अनलाच्या अनिल लहरी
सुळका भीषण पर्वताचा
करी दृढ तया निश्चयेसी
ती कलाकृती करण्यात इतका आनंद भरलाय की त्यापुढे त्याला कितीही अडचणी आल्या तरी त्यांची पर्वा नाही.
हातातील छिन्नी खोदते
मूर्ती संतत पाषाणातूनी
ध्येयाची धुंदी खुलवी
चांदणे गभस्तीच्या किरणातूनी
गभस्ती म्हणजे सूर्य. अर्थात शेवटली ओळ "रवीकिरणांची चांदणी" अशी दिली तर कविता अष्टाक्षरीत चपखल बसते. पण, गभस्ती या शब्दातून ऊन जितके टोचते तितके रवी शब्दातून न जाणवल्यामुळे तो शब्द वापरलाय. सारांश, ध्येयवेड्या लोकांना गभस्तीच्या किरणांतून यशाचे चांदणे खुलवण्याचा आनंद भेटतो असा विचार कवितेत मांडला आहे, :)