किती बरं वाटलं गं! नाहीतर 'जगात तूच एक एकमेवाद्वितीय अशी धांदरट बाई आहेस', अशा माझ्याभोवतीच्या अत्यंत हुशार आणि चलाख आणि तत्पर आणि टापटिपीच्या आणि इ.इ. इ. माणसांनी करुन दिलेल्या या समजावर माझा विश्वास बसायला लागला होता.  बरं आता आणखी काही गडबडघोटाळे! (हे वर अनुने उल्लेख केलेल्यांमध्ये भर म्हणून आहेत.)

१) कचेरीत जाताना भरुन ठेवलेला डबा विसरणे

२)मीठाची बरणी (गडबडीत चिरंजीवांचे कपडे शोधावे लागल्यामुळे) कपड्याच्या कपाटात ठेवणे व नंतर त्यासाठी प्रचंड शोधाशोध करणे.

३) दूध तापवायला ठेवून विसरुन जाणे

आठवतील तसे अजून लिहीन.

-स्वाती