सर्व मुद्द्यांचा योग्य परामर्ष घेणारी चर्चा मी आज अनुभवत आहे, याचा एक अर्थ असा निघतो कि भाषा हा आपल्या जिव्हाळ्याचा कसा विषय आहे हे यातुन समजते.
भाषेच्या दृष्टीने आजची परिस्थिती ही न भुतो न भविष्यती अशी निर्माण झालेली आहे. माहितीच्या स्फोटामुळे भले भलेही ( येथे भाषा ) पुर्णपणे गांगरुन गेलेले दिसतात. काही भाकिताच्या अनुसार अजुन २० वर्षांनी जगातील आजच्या प्रचलित अर्ध्या भाषा नष्ट झालेल्या असतील, आणि अर्धी लोकसंख्या फक्त इग्रंजी च बोलणारी / लिहणारी असेल.
या पार्श्वभुमीवर आपल्याला या बाबीचा विचार करायला हवा असे मला वाटते.
१. भारतीय भाषा या भगिनी समुह म्हणुन समजला जावा. प्रसंगी सहकार्याचा विचार करावा लागेल. दुर्देवाने शासनाची भुमिका अतिशय निष्क्रिय आहे.
२. हिंदी आणि मराठी भाषेतील लिपीचे साधर्म्य चा जास्तीत वापर करुन घ्यावा लागेल. तत्रंज्ञान आणि विज्ञानात याचा लाभ होवु शकतो.
३. मराठीचा विचार करता ज्ञानेश्वरापासुन ते सावरकर आणि जांभेकरापासुन ते केंगे-वेलणकर या सर्वांची आपल्याला परंपरा लाभलेली आहे त्यामुळे या संकटातुन सुध्दा आपण निभावुन जावु असे मला वाटते.
अजुन काही मुद्दे मांडता येतील, परन्तु सारभुत सांगायचे म्हणजे, व्यक्तिगत अनुभवातुन आपले दिर्घकालीन काहीतरी धोरण निर्माण झाले पाहिजे.
व्यक्ति म्हणुन आपल्या मर्यादा लक्षात घेता, शासनाने या कडे बघितले पाहिजे असे मला वाटते.
त्यामुळे काही वेळेस मराठीचा लाभ होणार असेल हिंदी ही आणि नसेल तर हिंदी भी असे म्हणायला पाहिजे.