श्री. विनायक यांनी घेतलेला कवितेचा अर्थ मला अभिप्रेत नाही.
लौकिक यशाचे आणि प्रयत्नांचे, कष्टाचे गणित नेहमीच समप्रमाणात असते असे नाही. प्रत्येक गोष्ट ही प्रयत्नसाध्य असते असेही नाही. पण तो काही या कवितेचा विषय नव्हे.
काही लोकांचे आयुष्य आपसूकपणेच बांधीव, रेखीव, सरळ रेषेप्रमाणे असते. त्यात अडचणी आल्याच तर त्या मी म्हटल्याप्रमाणे चवीपुरत्या, त्यांच्या आयुष्याची खुमारी वाढवणाऱ्या असतात. कोणत्याही संवेदनशील माणसाला ज्या गोष्टी अस्वस्थ करतील ( उदा. दारिद्र्य, सामाजिक विषमता...) त्या गोष्टींबाबत आनंदाने डोळेझाक करण्याचे कसब - नैसर्गिक किंवा प्रयत्नसाध्य - अशा लोकामध्ये असते. समाजातले असे लोक, त्यांची वाढती संख्या आणि त्यांची चिंताजनक असंवेदनशीलता हा माझ्या या कवितेचा विषय आहे.
कविता किंवा इतर कोणत्याही कलाकृतीच्या निर्मितीनंतर निर्मितीकाराचे तिच्यावर काही नियंत्रण रहात नाही. प्रत्येक आस्वादक आपापल्या विचारांनुसार, मगदुरानुसार, काही काही वेळा आपल्या पूर्वगृहानुसारही, त्या निर्मितीचा अर्थ लावण्यास मुक्त असतो.बालकवींची 'औदुंबर' हे या बाबतीतले ठळक उदाहण आहे.
याबाबत मतभेद असू शकले तरी चर्चा संभवत नाही.
सन्जोप राव