तस म्हणलं तर गीतरामायणा मधली सगळीच गाणी एक से एक आहेत. असच हे एक गाणं ज्यात सीता आपल्याला लागलेल्या डोहाळ्यांच वर्णन करते आहे. सीता  रामाला म्हणते

"ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे, डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे"

एक पुरुष असुनही गरोदर स्त्रीच्या लागलेल्या डोहाळ्यांचं वर्णन कुणी दुसरी स्त्री ही इतक्या सुरेखपणाने करु  शकणार नाही.  पुढे सीता म्हणते

"वाटते धरावे कुशीत पाडस भोळे,
मज आवडती ते विशाल निर्मल डोळे,
चुंबीन त्यास मी भरविन चारा चोजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे"

ह्यावरुन सीतेचा भाव पुर्णपणे डोळ्यासमोर उभा न राहीला तर नवलच

"का हसता ऐसे मला खुळीला देवा
एव्हढा तरी हा हट्ट गडे पुरवावा
का विनोद ऐसा प्रिया अवेळी साजे"

स्वतःच्या डोहाळ्यांबद्दल आपल्या पतीशी बोलताना येणारी लज्जा किती सहजपणे ह्या शब्दांमधुन व्यतीत झाली आहे.

आणि ह्या सगळ्याचा कळस म्हणजे बाबुजींचा आवाज, ज्या भावामध्ये गाण लिहिल आहे त्याच भावा सुरात तल्लीन होउन त्यांच गाणं

श्या पुढे लिहवतच नाहीये ः(