ह्यातील सर्व गुण किंवा दोष 'त्या'च्यात किंवा 'ति'च्यात आढळणारे दिसतातः

प्रामाणिकपणा त्याच्यात तर, लबाडी तिच्यात दिसून येते.
हुशारी तिच्यात तर, भोळसटपणा त्याच्यात.
खुषमस्करी ती करते तर, स्पष्टवक्तेपणा तो दाखवतो.
भिती तिला वाटते तर, विनोद तो करतो.
हुरहूर तिला असते तर, विरह तो अनुभवतो. (आणि दारू पितो.)
फसवणूक ती करते (सौम्य अर्थाने) तर, भाबडेपणाने तो फसतो.
चिकाटी तिच्यात असते तर, आळस हा त्याचा स्थायीभाव असतो.
शिक्षण ती घेते (हल्ली) तरी, तो अभ्यास करीत नाही.

तिने आणि त्याने ह्या कडे विनोद म्हणूनच पाहावे.