सगळ्याच गोष्टींचे पुरावे दिल्याशिवाय त्या खऱ्या आहेत असे न माणणे म्हणजे आपण विज्ञान युगात आहोत असा काहीसा समज आहे.मी तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे सचिनराव माझा असा समज (गैरसमज) मुळिच नाही....(पण तुम्हाला संपूर्ण मुद्दा माहित नसावा. मागच्या चर्चेवरुन आणि एकंदरीत इतर "निरोपांचा" परामर्श इथेच घेत आहे मंदारराव.)
फोटो हाच पुरावा आहे असं म्हणता का तुम्ही? जे वेडे सरस्वती नदीचा उगम शोधताहेत ते केवळ फोटो सारख्या गोष्टींवर अवलंबून आहेत का? पण त्यांच्या कार्यात अफाट अभ्यास आहे.... केवळ कल्पनाविष्कार नाही. (कल्पनाविष्काराला माझी हरकत नाही, ती बुद्धीची झेप आहे पण तो शोध नाही) जर ३०० वर्षांपूर्वी फोटोची सुविधा नव्हती तर माझ्या पणजोबांच्या मिशा पायापर्यंत लांब होत्या म्हणून फुशारकी मारण्यात अर्थ आहे का? आणि फोटोचा मुद्दा काढण्यात ही अर्थ आहे का? निदान त्यासाठी कुठलीशी बखर शोधायला हरकत नसावी.. नाहितर, हे सुपीक मेंदूचे किंवा सांगोवांगीचे खेळ आहेत असचं मी म्हणेन. प. वि. वर्तकांबद्दलही हेच म्हणेन आणि स्फुटनिक आणि निळावंती बद्दल असच म्हणेन.
बरेच वेळा देवस्थानात किंवा तत्सम ठिकाणी संपूर्ण कुलाचा तक्ता केलेला असतो. आमच्या कुटूंबाचा गेल्या २५० वर्षांपासूनचा आहे. तेव्हा मला माझ्या पणजोबा खापर पणजोबांची नाव माहित आहेत. त्यांची मुल बाळं, दत्तक विधानं ही माहित आहेत, पण तो तक्ता १००% बरोबरच आहे किंवा आम्ही ४०० वर्षांपुर्वी फार मोठे जमिनदार होतो आणि शिवाजी राजे किंवा पेशवे माझ्या खापर खापर पणजोबांबरोबर बसून एका पंक्तीत जेवायचे असे मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला ते पटलेच पाहिजे अस आहे का?
खाली अंजली ताईंनी एक अर्थ काढला आहे त्यात तरी पटायला पाहिजेच अस आहे का? त्या चंद्रप्रकाशाला प्रखर म्हणतात, मी शितल म्हणते, वानगी दाखल ५० उदा. (कवी कल्पना आणि वैज्ञानिक) देऊही शकते. चंद्रप्रकाश प्रखर असेल तर सूर्य प्रकाशाचे काय? असा प्रश्न मला लगेच पडतो म्हणून जे एकाला पटते ते दुसऱ्याला पटेल असं असायला हव का? याचा अर्थ, वेगळा अर्थ शोधणारे लोक चूक आहेत अस मला अजिबात म्हणायच नाही पण कुठलीही गोष्ट बिनधास्त चिकटवून टाकण्यापेक्षा थोडा जास्त अभ्यास करा. सत्या-असत्याच्या कानशीवर घासून पहा एवढच सांगायच आहे.
प्रत्येक माणूस स्वतःच्या गरजे प्रमाणे, कुवती प्रमाणे दुसऱ्या गोष्टिचा अर्थ काढत असतो पण "लार्जर द्यान लाईफ" अर्थ जेव्हा लोक काढतात तेव्हा त्यांनी त्या पुष्ट्यार्थ दाखले द्यावेत. नाहीतर इतरांनी त्यांना "उचलली जीभ लावली टाळ्याला" अस का म्हणू नये?
आता वळूया मंदार रावांच्या प्रश्नांकडे
१. उत्तर पहिलेः तुमच्या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. अजून काही काळाने कोणि म्हटल की पाच वर्तुळे पंचमहाभूते आहेत. अथवा पंचेंद्रियांचे उदा. आहे किंवा तानापीहीनिपाजा कींवा RGB सारखे रंग आहेत तेव्हा त्याच्या पुष्ट्यार्थ दाखले द्यावेच लागतील. नाहीतर ती एक शक्यता होते. तुम्ही तुमचे म्हणणे शक्यता आहे अस म्हणा मी विरोध करणार नाही. मी आधिच सांगितल आहे की तुमच्या कल्पना शक्तीची भरारी उत्तम आहे पण ती स्वतःच्या नावावर लावा...बढे आणि मंगेशकरांच्या का? त्या पेक्षा मंगेशकरांना स्वतः जाऊन विचारा, शहानिशा करा आणि मगच निष्कर्ष काढा. नाहितर डिस्क्लेमर टाका.
२. उत्तर दुसरेः तुम्ही ज्या शिल्पाबद्दल बोलता आहा तो पुतळा की तैलचित्र? व्हिएन्नात तो नक्की कुठे आहे? त्या इमारतीत कुठे स्थानापन्न आहे? अजूनही आहे की काढून टाकला? या काळात फोटो असायला हरकत नाही ना तसा तो नेटवर कींवा तुमच्याकडे उपलब्ध आहे का? तो बनवणाऱ्या कलाकाराचे नाव काय? ही गोष्ट गेल्या ५०-१०० वर्षांतील आहे तेव्हा अधिक माहिती मिळणे सहज शक्य आहे पण या प्रश्नांची सबळ उत्तरे नसतील तर केबीसीने केला म्हणून तुम्ही वापर करताय का?
यापुढे अजून कित्येक वर्षांनी ऑस्ट्रियन लोक मे.ध्यानचंदना देव समजतील अस तुम्हाला का वाटल हो? कारण कालौघात संदर्भ पुसले गेले तर ध्यानचंद भारतीय होते हे तरी त्यांना कस कळायच? त्यातून ऑस्ट्रियन लोक ख्रिश्चन (की ज्यू?) ते मूर्तीपूजा विशेष मानत नाहीत तेव्हा त्यांच्या डोक्यात देव ही संज्ञा का यावी. चला आता मानूया की त्यांच्या डोक्यात देव ही संज्ञाच आली तर त्यांचे पूर्वज "केल्टीक". केल्टीक देवांना चार हात नाहीत. चार हातांची संकल्पना हिंदूंची. तेव्हा शक्यता आहे की देवा ऐवजी ते ही सैतानाची मूर्ती समजतील?
तेव्हा तर्क जरुर काढा. शक्यताही वर्तवा....पण त्यावर अधिक अभ्यास करायला आणि जमल्यास पुरावे द्यायला हरकत आहे का?
मला या चर्चेत अधिक रस नाही.
चू. भू. द्या. घ्या. (ऑस्ट्रियन लोकांबद्दल माझे ज्ञान तोकडे आहे, वर चूक झाली असल्यास प्रतिसाद नंतर बदलेन)
प्रियाली