खरोखरीच अंतर्मुख करणारे, मनाला पटणारे, भावणारे असेच आहे हे लेखन (इथे माझा गंभीर चेहरा समोर आणायचा हं !) जर भावार्थ नेहमीच वेगळा असेल तर का करतो आपण हे प्रतिसाद लेखन ? कि केवळ काही मराठी शब्दांच्या शुद्धलेखनाचा तर नसेल ना हा सराव ? 'रिलेशन मेंटेनन्सच्या' आखाड्यात कोणता शब्द ठरतो श्रेष्ठ याची तर नसेलना ही चाचपणी ? 'नरो वा कुंजरो वा' न्यायाने तर नसतील या शब्दांच्या मायावी पायघड्या ? हे बघा वात्रटराव, जे मनात आले त्या विचारांचे प्रकटन केले आहे (तुम्हाला अर्थ लागला तर मलाही सांगा). 

आता आजचा प्रतिसाद - एकदम झकास !

अभिजित