प्रियाली,

आपल्या विचार प्रखर बुद्धिवादी आहेत. इथे पुराणातील वांगी उकरून काढून मला काही स्वतःच्या संस्कृतीची टिमकी वाजवायची नाहिये. पण जर तुम्ही भारतावर नजर टाकली तर दिसेल हा देश कर्मकांडांच्या विळख्यात अडकलेला आहे. सचिन तेंडुलकर ने  नुकतीच केलेली पूजा आणि त्यामागोमाग त्या मंदिराच्या वेबसाईट वर तशाच विधीसाठी झालेली नोंदणी काय दर्शवते?   शंकर म्हणा किंवा इतर अनेक देवता यांची पूजा घरोघरी आणि मंदिरातून अजूनही केली जातेय. लहानपणीच "बाप्पाला मोरया कर" असे सांगितल्यावर  मूर्तीसमोर जोडले गेलेले हात शेवटपर्यंत तसेच राहतात. मुले लहानपणी भातुकलीच्या खेळातील वस्तूंना, पात्रांना खरंच समजत असतात. त्यात इनव्हॉव होतात. पुढे मोठी झाल्यावर त्यातून बाहेर पडतात पण देवाचं काय? किती लोक यातून बाहेर पडतात? मूर्तीपूजा हे देवापर्यंत पोचायचे एक माध्यम आहे असे अनेक विचारवंत सांगतात. पण आपण मूर्तीलाच देव समजून बसतो. भातुकलीच्या खेळाप्रमाणे मोठी माणसंही मूर्तीलाच न्हाऊ , खाऊ घालतात. खरंच ते देवाची पूजा करत असतात? मनाला समाधान मिळाते वगैरे मान्य केले तरी तिथे देव असतो का?

स्वामी विवेकानंदांचे विचार आपण मानता की नाही मला माहित नाही. पण त्यांच्या प्रवचनांच्या एका पुस्तकात त्यांचे काही विचार नुकतेच वाचायला मिळाले. त्यात ते म्हणतात ."ख्रिस्ती धबराचसर्मातला  भाग जुन्या अ-ख्रिस्ती लोकांचे विश्वास व रूढी यांना नवी नावे अ नवा अर्थ दिल्यामुळे तयार झाला आहे. जर जुने आधार कायम राखले गेले असते आणि वेळोवेळी घडलेल्या परिवर्तनाची कारणे स्पष्टपणे मांडली गेली असती ब-याच गोष्ऱ्टी अधिक स्पष्ट झाल्या असत्या.वेदांमध्ये अनेक जुने विचार रक्षिले गेल्यामुळे अनेक अंधविश्वासही उत्पन्न झाले, कारण जुन्या कल्पनांचा अर्थ विसरून गेल्यानंतरही लोक त्यांना चिकटून राहिले."

तर मला सांगा की अजूनही प्रचलित असलेल्या रूढींमधून एखादा चांगला , समाजोपयोगी आणि युनिवर्सल (काही दिवसांनी यावर भाष्य करेन)  असा विचार कोणी मांडत असेल तर त्यात फार काही चूक आहे असे मला वाटत नाही.