मंदार,

मी फक्त वाचक आहे आणि माझ ज्ञानही तोकडच आहे. तुम्ही वर म्हणता त्यात काही ही चूक नाही. सचिन, अमिताभ, ऐश्वर्या, राजकारणी हे अत्यंत भित्रे लोक आहेत आणि आपल दुर्दैव की आपण त्यांना आदर्श मानतो. त्यांच्या गल्लीतला आणि घरातला देव त्यांना का पावत नाही हा मला न सुटलेला प्रश्न. आपला स्वार्थ साधण्यासाठी ते आपण समाजाच प्रतिनिधीत्व करतो हे भान सोडून अशा कृती करत असतात. त्यामुळेच की काय न जाणे पण सिद्धिविनायका समोर मंगळवारी तरुण मुला मुलींच्या रांगा असतात. यांना काम धंदे नाहीत का असा प्रश्न मलाही पडतो. असो.. ती  त्यांच्या श्रद्धेची कल्पना असू शकते. समजूया की त्यांना मनःशांती लाभली असावी.

तर मला सांगा की अजूनही प्रचलित असलेल्या रूढींमधून एखादा चांगला , समाजोपयोगी आणि युनिवर्सल (काही दिवसांनी यावर भाष्य करेन) असा विचार कोणी मांडत असेल तर त्यात फार काही चूक आहे असे मला वाटत नाही.

जरुर मांडा...माझा अजिबात विरोध नाही. जर तुम्ही माझा पहिला प्रतिसाद परत वाचलात तर मी राजा बढ्यांच नाव घेण्यावर विरोध दाखवला....कारण सांगण्यास उत्सुक आहे.

एखाद्या कलाकाराची आपली अशी शैली असते. उदा. ज्यूल व्हर्न..या माणसाची अफाट कल्पना शक्ती त्याच्या लेखनातून दिसते. त्याच्या अनेक गोष्टी भविष्यकाळातील वैज्ञानिक झेप सुचवतात. व्हर्न एका गोष्टिवर, कादंबरीवर गप्प नाही बसले हे त्यांचे साहित्य सांगते. 

दुसर उदा.,  समजा की "दा व्हिन्ची कोड" मधे डॅन ब्राउन म्हणतो त्या प्रमाणे लिओनार्दो द व्हिन्ची आपल्या चित्रांत गुपीत दडवायचा. माना की खर आहे. आपल म्हणण सिद्ध करायला ब्राऊन लास्ट सपर, वर्जिन ऑफ द रॉक्स, मोनालिसा अशी अनेक उदाहरणे देतो. केवळ एका चित्राबद्दल बोलला असता तर लोकांनी लिओनार्दो द व्हिन्ची काहीतरी दडवण्यात सामिल होता हे मानल नसत.

तेव्हा तुम्ही बढ्यांच नाव घेता तेव्हा खरच जर त्यांचा वैज्ञानिक कल्पनाविष्कार एवढा मोठा होता तर तो त्यांच्या इतर गीतांतूनही दिसला असता. त्यांनी तो इतर कलाकृतीतून सुचवला असता. हे माझ मत झाल. बढ्यांनी तस केल असेल तर जरुर लिहा मला वाचायला आवडेल.

जेव्हा तुम्ही लिहीता तेव्हा शक्यता सांगा, या गीताचा अर्थ माझ्यापरीने असाही होऊ शकतो, एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात असं म्हणा, शक्य असल्यास अधिक अभ्यास करा, दुवे द्या.....मी आधीच सांगितलय वाचायला आवडेल.

चू. भू. द्या. घ्या.

प्रियाली