..नंतर यांनीच मागास जाती, जमातींसाठी ८०% पर्यंत आरक्षण असलेल्या खास शाळांचा उल्लेख केला असल्याने, यांचे विचार आरक्षण विरोधी वाटत नाहीत...

हो, पण उच्चशिक्षणातील सध्या प्रपोज केलेल्या २७% आरक्षणाचे जशासतसे समर्थन करणारेही मला वाटत नाहीत. असे (न) वाटण्याचे कारण म्हणजे संपूर्ण लेखच मूळी 'पोलिटिकली करेक्ट' भाषेत लिहीला आहे! मागासवर्गियांसाठी ८०% आरक्षण असणाऱ्या शाळा काढाव्यात असे ते म्हणतात, पण उच्चशिक्षणातील आरक्षणाच्या सत्तावीसचा "स" सुद्धा लिहीत नाहीत. क्रिमींबद्दल ही स्पष्ट भूमिका देत नाहीत. त्यामुळे या लेखाच्या आधारे असे काहीही वाटवून घेणे संदिग्ध गृहितकावर आधारित आहे असे मला वाटते. (त्यांचा दुसरीकडे काही २७% बाबत असंदिग्ध भुमिका असणारा/ वाटणारा लेख आहे का?)

(ह घ्या पण, खुद्द अर्जुनसिहांनी किंवा युथ फ़ॊर इक्वालिटी च्या थोड्या मवाळ सदस्यांनी जरी हा लेख वाचला तरी त्यांनाही ते छान्छानच वाटेल एवढी तसदी या लेखात घेतली आहे. आहे की नाही? ः))

तुमच्या चौथ्या परिच्छेदाशी मात्र माझी किंचित सहमती आहे.