पावसाळ्यात तुंग वा सह्याद्रीमध्ये भटकण्यात मजाच असते.
फोटो पाहून परत एक हुरहुर झाली. जेवताना कधी कधी आवडीचे सगळेच एकसाथ खावेसे वाटते...तसेच हे पण ..सगळ्या गड किल्ल्यांची मजा एकसाथ घ्यावीशी वाटते.
असो.
एक उगीचच सल्ला.. पटला तर घ्या.. नाहीतर सोडून द्या.
तुमचे फोटो आवडले. (मी आधीही तुमचे बरेच फोटो पाहिले आहेत. आणी ते आवडलेही आहेत) पण भडक रंगाचे कपडे टाळता आले तर पाहा.. माझे मत तरी असे आहे की (दुसऱ्यांची उलट असू शकतील).. निसर्गात जाताना त्याच्याशी जुळतील अशा रंगाचे कपडे वा बॅग असावी..